*भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा उदगीर येथील कार्यक्रम लांबणीवर*

       लातूर, (जिमाका) :  भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार होते.  मात्र, माननीय राष्ट्रपती महोदया यांचा पूर्वनियोजित महाराष्ट्र दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून कळविण्यात आले आहे. परिणामी उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
       परंतु दौरा रद्द होण्याचे ठोस कारण प्रशासनाकडून समोर आलं नसल्याकारणाने प्रसारमाध्यम आणि नागरिकांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या