माजलगाव (रविन्द्र राऊत)महाराष्ट्र शासनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी घोषित केलेला महसूल पंधरवडा दि.१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्हाभरात राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माजलगाव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात सुद्धा महसूल पंधरवाडा कार्यक्रम राबवण्यात येत असून यासाठी माजलगावचे सहदुय्यम निबंधक बालाजी दारेवार हे कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे.
या महसूल पंधरवड्यानिमित्त माजलगाव सहदुय्यम निबंधक कार्यालयात मागील दहा दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबवत परिसरातील अनावश्यक वाढलेले झाडे-झुडूपे,तण गवत कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने काढून परिसर स्वच्छ केला आहे.तसेच कार्यालयातील भिंतींना रंगरंगोटी करून भिंतीवर शासनाच्या विविध योजनांचे व माहितीचे फलक लावण्यात आलेले आहेत.कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना शासनाच्या या विविध योजनांची माहिती स्वतः सहदुय्यम निबंधक बालाजी दारेवार हे देत आहेत.तसेच संपूर्ण सहदुय्यम निबंधक कार्यालयात कृत्रिम फुलांची सजावट करून महसूल पंधरवडा उत्साहाने राबवण्यात येत आहे.दि.१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान महसूल पंधरवाडा कार्यक्रमाचे योग्य नियोजन हे सहदुय्यम निबंधक कार्यालय माजलगाव येथे केले आहे.हा कार्यक्रम १५ ऑगस्टपर्यंत यशस्वी करण्यासाठी सह दुय्यमनिबंधक कार्यालयातील सह दुय्यम निबंधक बालाजी धारेवर यांच्यासह वरीष्ठ लिपिक सुरवसे, कनिष्ठ लिपिक विनोद मुनेश्वर व इतर कर्मचारी मेहनत घेत आहेत.
वैशिष्ट्यीकृत बातम्या
पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
-
माझ्या प्रिय मित्रांनो, काल लातूर आणि संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांनी डॉल्बीमुक्त मिरवणुकांसाठी एक नवीन ट्रेंड स्थापित क...
-
लातूर,(जिमाका) : दि. ३१ ऑगस्ट २०२५: परिवहनेत्तर (मोटरसायकल) संवर्गातील वाहनांसाठी MH24-CC ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मा...
-
लातूर, (जिमाका) : महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा कणा मानला जातो. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक ...
-
लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...