सुंदरराव सोळंके महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान उत्साहात, विद्यार्थ्यांची शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा तसेच संविधान ग्रंथ वाटप

              माजलगाव (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सुंदरराव सोळंके महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान आज दि.15 रोजी साजरा करण्यात आला.  महाविद्यालयाच्यावतीने माजलगाव शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.तर संविधानाच्या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. 
      भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधी दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आला.दि.14 ऑगस्ट रोजी महाविद्यालयातून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.या तिरंगा पदयात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी भारताचा जयघोष करत घोषणा दिल्या व तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी,प्राध्यापक कर्मचारी यांना महाविद्यालयात संविधानाच्या प्रतिचे वाटप करण्यात आले.यावेळी पदयात्रेमध्ये प्राचार्य डॉ. जी.के.सानप,उपप्राचार्य डॉ.एन.के.मुळे, उपप्राचार्य डॉ.एम.ए.कव्हळे,उपप्राचार्य प्रा. प्रकाश गवते,उपप्राचार्य पवन शिंदे,रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.उमेश राठोड,प्रा.बीलास काळे,प्रा.ओमप्रसाद सारगे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
      दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या