*नांदेड परिक्षेत्रातील अवैद्य यवसायांचे समूळ उच्चाटनासाठी पोलीस अधीक्षकांचे अधिपत्याखाली विशेष पथकांचे गठन*

     लातूर (पोअका) : पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्या नंतर परिक्षेत्रातील नांदेड, परभणी लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यात स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलिस प्रभारी अधिकारी यांना अवैद्य व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशा सर्व व्यवसायांच्या निर्मूलनासाठी त्यांना दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याचप्रमाणे हातभट्टी दारूचे निर्मूलनासाठी दिनांक 3 ऑगस्ट व 10 ऑगस्ट रोजी परीक्षेतील चारही जिल्ह्यात मासरेडचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक/ सहाय्यक पोलीस निरीक्षक व अंमलदार यांचे सह स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता. अवैद्य व्यवसायाच्या उच्चाटनासाठी चारही जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेमुळे दिनांक 1 ते 15 ऑगस्ट 2024 या 15 दिवसाचे कालावधीत अवैद्य व्यवसाया विरुद्ध परिक्षेत्रात सुमारे 1163 केसेस नोंदविण्यात आल्या असून दोन कोटी 28 लाख 59 हजार 556 (2,28,59,556/-) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील लातूर जिल्ह्यात सर्वाधिक केसेस 376 व सर्वाधिक  एक कोटी 68 लाख 15 हजार 35 (1,68,15,035/-) रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात हातभट्टी दारू, दारूचे रसायन, देशी दारू, विदेशी दारू, सिंधी, गुटखा, गांजा, जुगार, अवैद्य वाळू उत्खनन व वाहतूक इत्यादी सदरा खाली केलेल्या कारवाईचा समावेश आहे.
       दिनांक 15 ऑगस्ट 2024 पासून अवैद्य व्यवसायांच्या निर्मूलनासाठी प्रत्येक पोलीस अधीक्षकांचे अधिपत्याखाली त्यांचे जिल्ह्यात विशेष पोलीस पथक तयार करण्यात आली आहेत. संबंधित पथकात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक व 5 पोलिस अमलदार यांचा समावेश असणार आहे. या पथकांना कार्यक्षेत्र ठरवून देण्यात आले आहे. सदर पथकांच्या कामगिरीचा आढावा प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक हे दैनंदिन पातळीवर घेणार असून त्यांनी उघडकीस आणलेल्या अवैद्य व्यवसायांबद्दल पथकांना बक्षीस देण्यात येणार आहेत. तर ज्या पोलीस ठाण्यांचे हद्दीत अशा प्रकारचे अवैध्य व्यवसाय आढळून आले त्यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करणार आहेत.
        नांदेड जिल्ह्यात 5 परभणी व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 4 व हिंगोली जिल्ह्यात 3 अशा प्रकारची विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. आपल्या भागातील अवैध्य व्यवसायांची माहिती नागरिकांनी संबंधित पोलिसांना देऊन पोलिसांच्या सदर मोहिमेस हातभार लावावा. असे आव्हान पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या