सांची बुद्ध विहारात श्रावण पौर्णीमा उत्साहात साजरी

        
        माजलगाव(प्रतिनिधी)  : तथागत भगवान बुद्धांच्या जिवनात वर्षाच्या बारा पौर्णीमांना महत्व आसुन प्रत्येक पौर्णिमा बौद्ध बांधव विविध ठीकाणी उत्साहात साजरी करत आसतात.त्याप्रमाणे सांची बुद्ध विहार डॉ.आंबेडकर भवन केसापुरी कॅम्प येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका - शाखा माजलगांव च्या वतीने वर्षावासातील महत्वाची आसणारी श्रावण पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष डॉ. भागवत साळवे हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार सचिव श्याम वाघमारे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते अंकुश जाधव,माजी संरक्षण उपाध्यक्ष गुलाब प्रधान,बहुजन समाज पार्टी चे अभिमन्यु साळवे,हरिभाऊ साळवे,भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष एल.आर.मस्के,महिला शहर अध्यक्षा वंदनाताई घनघाव,शेलापुरीचे उपसरपंच नाथाजी घडसे हे उपस्थित होते.या कार्यक्रमात शामभाऊ वाघमारे यांनी श्रावण पौर्णीमेचे महत्व व पराभव सुत या विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारतीय बौद्ध महासभा ता.संघटक पांडुरंग जाधव यांनी केले तर आभार भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार उपाध्यक्ष गुलाब धाईजे यांनी मानले तर सुत्रसंचलन संस्थेचे ता.सरचिटणीस सिद्धार्थ वक्ते यांनी केले.वर्षावासत चालु असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन संस्कार उपाध्यक्ष गुलाब धाईजे यांनी केले तर या कार्यक्रमा साठी भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष डी.एस.साळवे व सुभद्राबाई साळवे यांनी भोजन दान दिले.
       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चक्रधर पोटभरे,डी.पी.पोटभरे,डी.पी.वाघमारे,बाबासाहेब घनघाव,नितीन डोंगरे,राजभाऊ साळवे तात्यासाहेब साळवे,भगवान डोंगरे,मोहनराव काकडे,बुद्धभुषण साळवे,लिलाताई उजगरे, पोटभरे ताई,मायाताई स्वामी, विशाखाताई वाघमारे,मंदाताई साळवे,शारदाताई तांगडे,सिमा साळवे,प्रिती साळवे,कोमल साळवे सह भारतीय बौद्ध महासभा तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*

       लातूर (पोअका)  : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...

लोकप्रिय बातम्या