राष्ट्वादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर नरवडे- खा.कोल्हे, खा.सोनवणे यांनी दिले नियुक्तीपत्र

        माजलगाव, (प्रतिनिधी)राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेलच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर ज्ञानोबा नरवडे यांची निवड दि.16 ऑगस्ट रोजी करण्यात आली असुन नियुक्तीपत्र खा.अमोल कोल्हे,माजी राज्यमंत्री राजेश टोपे,खा.बजरंग सोनवणे,प्रा.ईश्वर मुंडे यांनी दिले. 
          मतदारसंघातील रहिवाशी प्रभाकर नरवडे यांनी 34 वर्षे पोलिस खात्यात सेवा दिलेली आहे.त्याचबरोबर लसोकसभा निवडणुकीत खा. बजरंग सोनवणे यांच्या विजयातही त्यांचा मोठा वाटा आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेवुन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेलचे राज्य प्रमुख प्रा.ईश्वर मुंडे यांनी श्री.नरवडे यांची बीड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.समाजातील सर्व घटकांना सोबत घेवुन पक्षाची ध्येय धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असल्याचे श्री.नरवडे यांनी सांगीतले. निवडीबद्दल त्यांचे नारायण डक,मा.आ. राधाकृष्ण होके पाटील,विश्वंभर थावरे,दयानंद स्वामी,कचरू खळगे,दिपक सोळंके,युवराज लगड,मनोहर डाके,राहुल सोनगुडे यांचेसह मित्रपरिवार,आप्तेष्ट,नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या