माजलगाव,(प्रतिनिधी)तालुक्यातील सोन्नाथडी जिल्हा परिषद शाळेमध्ये १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणानिमित्त चेअरमन रमेश फपाळ यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना गणवेश(खेळाचे)वाटप केले.या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तालुक्यातील सोन्नथडी जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाच्या योजनेतून येणारे शालेय गणवेश न आल्याने शाळेचे मुख्याध्यापक तथा चेअरमन रमेश फपाळ यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे गणवेश त्यांच्या स्वखर्चाने दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रमेश फपाळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडिया बँकेचे शाखा अधिकारी महादेव घनवट,थावरे, शिंदे,मारुती कावळे, गणेश कावळे यांची प्रमुख उपस्थिती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गांजुरे यांनी केले तर शाखा अधिकारी महादेव घनवट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश चे वाटप करण्यात आले. यावेळी घनवट यांनी आपल्या भाषणातून मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकलो स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आपण सुद्धा असेच अभ्यासात सातत्य ठेवा नेहमीच यश मिळेल. जिल्हा परिषद शाळेतीलच विद्यार्थी यशस्वी होऊन आज उच्च दर्जाचे अधिकारी झाल्याचे दिसत आहे. इंग्लिश स्कूल पेक्षा जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वगुणसंपन्न शिक्षक असून संस्कार जिल्हा परिषद शाळेत दिले जातात असेही घनवट यांनी मनोगतात व्यक्त केले. यावेळी रमेश फपाळ यांनी आपल्या मनोगतात आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महान देशभक्ताने स्वतःच्या जीवाच्या बलिदानाची परवा न करता अहोरात्र प्रयत्न केले म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश फपाळ ,गांजुरे ,पारडे ,साखरे यांनी सहकार्य केले.