माजलगाव (प्रतिनिधी) : माजलगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी वृत्तपत्राच्या बाबत तथ्यहीन वृत्त छापणारे पेपर असा केल्यामुळे संपूर्ण वृत्तपत्राच्या माजलगाव येथील पत्रकारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत निषेध रॅली काढून जाहीर निषेध व्यक्त केला.
आ.प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन जयसिंग सोळंके यांना वारसदार म्हणून घोषित केले.माजलगाव मतदार संघाच्या जनतेसाठी नवख असणार नेतृत्व जयसिंग सोळंके यांच्यासाठी माजलगाव मतदार संघात आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते.याच आशीर्वाद यात्रे दरम्यान दिंद्रुड येथील जनतेने आमदार सोळंके यांना एका प्रकरणाच्या बाबतीत छेडले असता पेपर वाले हे सर्व बातम्या खोट्या छापतात त्यामुळे मी पेपर वाचत नाही, असे संताप जनक वक्तव्य केल्याने संतप्त पत्रकारांनी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक अशी निषेध रॅली काढून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी अनेक पत्रकारांनी बोलताना सांगितले की,प्रकाश सोळंके कोणते धुतलेल्या तांदळासारखे आहेत यांनी जमवलेली माया खोटे बोलूनच जमवलेली आहे,असे असतानाही अखंड देशाच्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर बोलण्याचा यांना अधिकार नाही.प्रकाश सोळंके यांच्या अशा वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील जनता धूळ चारून घरी बसवेल, अशा संतप्त प्रतिक्रिया पत्रकारांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.