जनतेला टाळेबंदी, प्राणी सैराट कसे

जनतेला टाळेबंदी, प्राणी सैराट कसे



लातूर (लातूर प्रभात प्र.) ः कोरोनाच्या विषारी जंतूने सर्वसामान्याचे जगने कठीण केले असून, कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सुचनेनुसार लातूर शहर जिल्ह्यात लॉकडाउनचे उपाय शोधून तशी बंदी करण्यात आली.  त्याप्रमाणे जनतेचे सहकार्य लाभतही आहे.  पंरतू शहरी भागासह गल्लो गल्लीत कुत्रे, जनावरे मोकाटापणे फिरतात त्यावर जिल्हा प्रशासन किंवा लातूर महानगरपालिकेने टाळेबंदी  का केली नाही, अशी ही चर्चा होताना दिसते आहे. 
 लातूर महानगरपालिकेचा जनावरासाठीचा कोंडवाडा आहे.  तो हरवला की, मनपाने प्राण्याविना रिकामा ठेवला असा प्रश्‍न समोर येत असून कोरोना रोगा विषयी लातूर मनपा गंभीर नाही, अशीच चर्चा होताना दिसते आहे.  मुळात कोरोना कोवीड १९ या जंतूचा प्रसार हा पक्षी प्राण्यापासूनच झाला असताना जिल्हा प्रशासन मात्र महिला पुरुषांना कोंडवून जनावरानां सैराट सोडते आहे, असा प्रश्‍न लोकाना भेडसावीत असतानाच गल्ली बोळात, कोपर्‍यात तरुण मुले सुपारी चघळत, धुर काढीत असताना, गस्तीवर असलेले पोलीस व त्यांची वाहने त्यांच्या समोरुन जाता, पण त्यांना हटकत नाहीत, पंरतू मॉर्नीगं वाकला गेलेल्यांना जानीवपूर्वक हटकून त्यांच्यावर खटले भरले जातात, अशा या कृतीमुळे नागरीकात संताप व्यक्त होताना दिसतो आहे.  त्यातच जनतेला टाळेबंदी प्राणी सैराट कसे अशी संतापजनक चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या