असहाय्य सरकार
आणि आशावादी मजूराची ससेहोलपट
लातूर (लातूर प्रभात प्र.) ः दुष्काळ पडलाकी असंघटीत कामगार, मजूर शहरे जवळ करतात. आणि भुकेकंगाल बनलेले मजूर कामकरुन आपापली भूक भागवीत असतात. पण आजघडीला विषारी कोरोना रागाने सार्या जगालाच भिरुड लावले असून त्यात भारतीय असंघटीत कामगार, मजूरांची ससेहोलपट असली तरी न्यायमार्गापासून सरकार असमर्थ ठरते आहे ही वास्तवता नाकारता येत नाही, असे स्पष्ट मत पूणे येथील सावित्री फुले विद्यापीठातील प्रा. श्रुती तांबे यानी एका लेखातून व्यक्त केले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील यूध्दे, स्वातंत्र्यासाठीची लढाई, स्वातंत्र्यानंतरची युध्दे आणि दुष्काळी परिस्थिवर मात करणारे नागरीक असंघटीत कामगार व मजूर आजघडीला कोरोनाच्या संकटामूळे असमर्थ ठरली असून घरातच कोंडून घेवून प्राण मूठीत घेवून आशेने कोरोनाचा नायनाट व केंद्र सरकारच्या मदतीकडे पाहाताना दिसतात या जीवघेण्या समस्याची सोडवणूक कशी व कधी होईल याकडेच कामगार मजूराचे लक्ष लागल्याने सरकारी यंत्रणा काय न्याय देते यावरच सर्व काही अवलंबून असून कामगार-मजूरांना विषय वागणूक मिळू नये अशी अपेक्षाही तांबे यानी केली आहे.