कोरोना रोगाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर सावट

कोरोना रोगाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर सावट


दिल्ली (लातूर प्रभात प्र.) ः समग्र प्रवर्तन लढ्यातील दिग्विजयी नेते, आधूनिक भारताचे प्रेरणास्त्रोत दीन दिलतांचे कैवारी, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बॅरिस्टर बी.आर. आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर कोरोना रोगाचे सावट आल्याने आंबेडकरी बौध्द, दलित जनतेत निराशा पसरली असल्याचे चित्र दिसते आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे एक राष्ट्रीय सणच म्हणून जगभरात साजरा केला जातो.  भारतात तर बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाला उधारणय येत असते.  महाराष्ट्रातील जनसागर पाहता तिथं सागर ही स्तब्ध होत असावा अशा जोषात जयंती साजरी केली जाते परंतू महाभयंकार अशा विषारी कोरोना रोगाने आंबेडकरी जनतेच्या उत्सावर विविध उपक्रमावर पाणी फेरले आहे अशीच चिंताजनक चर्चा होताना दिसते आहे. 
 आंबेडकरी विचार चळवळीतील समाज, दीन, दलित, बौध्द असे सर्वघटकातील लोक नवनवे कपडे खरेदी करीत असतात.  निळे झेंडे, आणि घरा घरात गोडधोड जेवण असतेच यात निव्वळ रोजची चूल पिटविण्याची भ्रांत असलेले कुटूंबही नवीन कपडे घरात चांगले चविष्ठ पदार्थ करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना ढोलताशाच्या गजरात मिरवणूकीने जावून मानवंदना, अभिवादन करीत असतात पण जीवघेण्या कोरोना रोगाचे आंबेडकरी जनतेच्या उत्साहात विष कालविले अशीच चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या