व्यापारी-स्वस्त
धान्य दुकानदाराकडून लूबाडणूक
लातूर (लातूर प्रभात प्र.) ः भयावह कोरोना रोगाचा मुकाबला करणेसाठी शासनाने संचारबंदीसह लॉकडाउन लादल्यामूळे सर्वसामान्यच जनतेला गरजू वस्तू खरेदी कराव्या लागतात पण किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते चढ्याभावाने मालविक्री करीत असले तरी नाविलाजाने सर्वसामान्य जनतेला ही पिळवणूक-लूबाडणूक सहन करावी लागते आहे.
विशेष म्हणजे निराधार, गरीब, कामगार मजूराना दरहिण्याला मोफत पाच किलो तांदूळ प्रत्येकी व्यक्तीस देण्याचे फर्माण सोडले असले तरी पूर्वभागातील स्वस्त धान्य दुकानदार प्रत्येक रेशनकार्ड धारकाला प्रत्येक माणसास नव्हेतर एका कार्डावर फक्त पाच किलो तांदूळ तेही प्रतिकीलो ५ रुपया प्रमाणे तांदूळ देत असल्याचे मोफतबाजी ही सरकारी फसली घोषणा आहे की जाणीवपूर्वक स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकाडून प्रतिकीलो ५ रुपये वसूल करीत असावेत अशी ही शंकात्मक चर्चा होताना दिसते आहे.