संपादकीय...
अंधश्रध्देचे खूळ कशाला
भारत लोकशाहीप्रधान धर्मनिरपेक्ष देश म्हणून जगाच्या पाठीवर कार्यरत आहे. धर्म आणि जात ही वैयक्तीक बाब आहे. सामाजीक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधू, भाव, न्याय व हक्कानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय राज्य घटनेनुसार देशाचा कारभार चालतो आहे. याच संविधानाची शपथ घेवून भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे कार्यरत आहेत अशी खात्री भारतीय नागरीकांना होते आणि आहेच.
आजवर भारतीय नागरीकांनी, प्रशासनाने, पोलीस यंत्रणेने अनेक जिवघेण्या संकटाचा सामना केलेला आहे. त्या यशस्वीताही मिळविली आहे. पण आजघडीला महाभंकर अशा प्राणघातकी कोरोना कोवीड १९ या विषारी रोगाने जगासह भारतलाही पच्छाडलेले आहे. त्यास भारतीय नागरीक, शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा डोळयात तेल घालून रात्रंदिवस मुकाबला करीत असताना दिसते आहे. वैद्यकीय संस्था, डॉक्टर, आणि त्यांचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णाची तपासणी व उपचार करीत आहेत. त्यामूळे कोरोना जैसे थे आहे. कोवीडची लागण झालेल्या आणि संशयीत संसर्ग झालेल्याना उपचार कले जात आहेत. यातूनच कोरोनास पाबंदी येत असल्याचे चित्र दिसते आहे.
कोरोनाच्या संसर्गाने देश पोखरला जातोय, वैद्यकीय क्षेत्र जीवापलीकडे जावून रुग्णावर उपचार करीत ओत. लोक आधारावर जनता संचार बंदी लागू केली गेली. पून्हा लॉकडाउन, टाळेबंदी जारी केली गेली. प्रधान मंत्री व राज्या राज्याचे मुख्यमंत्री आपापला इलाखा सांभाळत होते. जनता प्रशासनाला शासक-लोकप्रतिनिधीना सहकार्य करीत होती तर शासक, प्रशासक, प्रशासन पोलीस यंत्रणा जनतेला धीर देत होती. युध्दपातळीवर कोरोना रुग्णाची तपासणी उपचार चालू असतानाच घंटी व थाळी वाजवून थकलेल्या संदेशकार, घोषणाबाज प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रवास अंधश्रध्देच्या मार्गाने सुरु झाला आणि कोरोनालाच मागे टाकले याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसावे अशी चर्चा होताना दिसते आहे.
प्रधान मंत्री नरेंद मोदी या एकट्या लोकसेवकाने-लोकप्रतिनिधीने काय काय करावे, जनतेसह देशाचा विकास करावा की सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञान व अण्वस्त्र वाढीसाठी लक्ष केंद्रीत करावे की महासत्ताक भारत बनविण्यासाठी धडपड करावी किंवा येणार्या सामाजीक-राजकीय, आंतरराष्ट्रीय संकटाला तोंड द्यावे की विषारी कोरोनाचे निर्मूलन करुन भारतीय जनतेला सामूहीकरित्या मन की बात ऐकण्यास मोकळे करावे असे अनेक प्रश्न, उपक्रम, संकल्प त्यांच्या अजेंड्यावर असतानाच मध्येच कोरोनाचे टांग आडवी केली आणि प्रधान मंत्री नरेंद्र मोदी याना साक्षात्कार झाला अन् अंधश्रध्दा निर्मूलनाऐवजी संकटमार्गे अंधश्रध्देतून मेणबत्ती पाजळावी आणि शांत व नितळ प्रकाशात कोरोनाग्रस्ताचे मुडदे पाहावेत अशी प्रधान मंत्री म्हणून मोदी यांची धारणा झाली असावी म्हणून रविवारी पाच तारखेला नऊ वाजता नऊ मिनीटे दिवे उजळविण्याचे आवाहनच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी त्याच्या खास संदेशातून केले. वेळ, दिनांक काढण्यासाठी पंचागंकर्ते किंवा भोंदू ब्राम्हणाकडे जाण्याची गरज नव्हती कारण सेवेला आदित्यनाथ योगी आहेतच. तशी प्रधान मंत्री महोदयानी पूर्वीच सोय करुन ठेवली असावी अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.
प्रारंभी अतिवृष्टीमूळे पिकाची नासाडी झाली. पुन्हा पावसाअभावी पिके होरपळून गेली. आमजनतेला झळ पोंहचली दुष्काळी परिस्थिती आली. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करु लागले. कामगार, मजूर हाताला काम नाही म्हणून त्याची उपासमार होवू लागली, भूक बळीची अवस्था निर्माण झाली त्यात कोरोना कोवीड रोगाने देशभरात थैमान माजविले. त्यांत अनेकाचे प्राण गेले. अनेकजन सलाईनवर आहेत. तर कोणी तपासणीत अशाना धीर देणे, औषधी, इंजेक्शनचे संशोधन करणे आहे. त्या औषधीवर यूध्दपातळीवर उपचार करणे, निधी संकलनातून औषधी पुरविणे, कामगार, मजूराना रोजगार उपलब्ध करणे देणे हे असे न्यायीक कार्य सोडून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे अंधश्रध्देचे खूळ घेवून भारतातील तमाम नागरीकानाच दिशाभूल करुन विचलीत करीत आहेत की काय अशी ही उलटसूलट चर्चा होत असून मेणबत्तीच्या दिव्याखाली कांहीतरी दडलेले अशी ही शंका लोकमनातून व्यक्त होताना दिसते आहे.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे मास्टर माईन्ड राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत, अमित शहा, आणि त्यांचा चमू हे आहत. त्याना पुन्हा एकदा भारताचे हिंदू राष्ट्र करायचे असेल म्हणूनच अंधश्रध्देच्या पायघड्या घालून कोरोनामूक्त भारत करु पाहत आहेत. अशाया थापाड्या नरेंद्र मोदी किती दिवक देणार आहेत अशी चर्चा होत असून भारतीय जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये अशी ही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. म्हणूनच अचानकच कोरोना हटावो, कोरोना मूक्त भारत बनाओ म्हणारे प्रधान मंत्री अंधश्रध्द कसे झाले हेच कळेनासे झाल्याचे बोलले जात आहे. प्रधान मंंत्री कोणी ही असो त्या पदाला व त्या व्यक्तीला अंधश्रध्दा शोभत नाही हे अर्धसत्य नाकारता येत नाही. महासत्ताक भारत, धर्मनिरपेक्ष भारत, लोकशाही भारत म्हणून सार्या जगाला छाती बडवून सांगणार्या प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना तर नाहीच नाही पण अचानक प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात अंधश्रध्देचे खूळ कसेच आले याचीच चर्चा होताना दिसते आहे. याचे निराकारण कोण करणार हा प्रश्न आहे.