संपादकीय...
रंग माझा वेगळा
भारतीयानो सावधान, मी कोरोना कोवीड १९ बोलतोय, ज्या चीन मधून मी सार्या जगाला घेरलो आहे, त्या चीननेही मला ओळखलेले नाही. मग तूम्हा भारतीयाची काय विशाद आहे. माझा रंगच वेगळा आहे. तूम्ही सारे भारतीय भारतातील तत्पर जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रामुळेच आबाधीत आहत अन्यथा तूमची अवस्था अमेरिका, इटली, स्पेन जर्मनी चीन सारखीच झाली असती हे विसरु नका म्हणजे झाले असे तूम्हा भारतीयांच्या वृत्तपत्रीय संपादकीयातूनच सांगतो आहे हे लक्षात ठेवा.
माझा जन्म चिनमधूनच झाला पंरतू चीन या जन्मभूमीला गद्दार होउ नये म्हणून चिन मधील लाखो रुग्णात माझा संचार झाला तर लाखो बाधीत झालेत हे विसरु नका. सार्या जगावर राज्य करणार्या महासत्ताक अमेरिकेलाही मीच जखडून ठेवलेले आहे. येथील वैज्ञानीक क्षेत्र माझ्या पाबंदीसाठी औषधी, इंजेक्शन शोधत आहेत. इटली, स्पेन जर्मनीचीही तिच अवस्था असून जगभरातील तब्बल २५४ देशात मी शिरकाव केलाय असे तूमची भारतीय वृत्तपत्रेच सांगत आहेत हेही विसरु नका, किंवा धास्तावूनही जाउ नका. माझ्यातील कोवीड १९ या विष्याणूला तूम्ही घाबरलात तर तूमची गय नाही हे मूद्दामहून सांगतो आहे.
चीन मध्येच मी व्यवस्थीत होतो पण अमेरिका, इटली, स्पेनने मला डिवचले आणि उपाययोजनाची सरबती सुरु केली. माझा राग, रंग मलाच अनावर झाला आणि मी रंग बदलून सरळ सार्या जगाला वळसा घातला आहे. भारत तर अमेरिके बरोबर बरोबरी करुन चीन-पाकीस्तानला धमकावीत होता तशी धमक भारतात आहे, पण माझ्यातला कोवीड १९ ला नष्ट करण्याची ताकद भारतीयात नाही केवळ साधनसामूग्रीचा अभाव असताना माझ्यातला विषाणूवर मात करणारी औषधी, इंजेक्शन नसतानाही इतर रोगावरील औषधाचा वापर करुन भारतीय वैद्यकीय अधिकार्यानी मला काबूत ठेवले आहे. त्यात भारतातील जिल्हा प्रशासन यंत्रणा व पोलीस यंत्रणा तत्पर व सक्षम मनोधैर्याची असल्यानेच मला भारतात अधीकचा फैलाव करणे जिकरीचे झाले असून मी आहे त्या ठिकाणीच स्तब्ध थांबलो आहे. ते केवळ भारतीय नागरीकाच्या जिवीतासाठीच असे समजा पण गाफील राहू नका अशी मी कळकळीची विनंती करतो आहे.
भारतीय नागरीक प्रामाणीक व धाडसी आहेत. आलेल्या संकटाला तोंड देण्याची ताकद त्यांच्यात आहे. म्हणूनच जनतेनेच शासकीय यंत्रणेला, केंद्र सरकारला बजावून स्वतः होवून जनता संचार बंदी लादून घेतली त्यानंतर केंद्र शासनानेच जनतेच्या विश्वासावरच भिस्त ठेवून लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि भारतीय जनतेनेच स्वतःसह कुटूंबीयानाही घरात कोंडून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामूळे मला शिरकाव करता येत नाही हे मी कबूल करीत आहे. पण मी कोरोना बोलतोय माझ्यावर विश्वास ठेवू नका मी विषारी आहे. मी संधी कधीच सोडत नसतो त्यासाठी घरातच कोंडून राहा मी भारताबाहेर स्वतः होवून जात नाही. तो पर्यत माझ्यापासून दूरच राहा असे मी कोवीड १९ सांगतोय हे लक्षात ठेवा म्हणजे झाले एवढेच मला सांगायचे आहे.
मी कोरोना आहे, माझ्यात कोवीड १९ हे विषारी जंतू आहेत. माझ्या शरीरात गरजेपेक्षा जास्त साठवण झाली कीच ती कोवीड जंतू मी मानवी शरीरात त्यांच्या श्वासाद्वारे संक्रमण करतो आणि माझे विषाणू कोष हलके करीत असतो मी अदृश्य रोग आहे. दिसत नाही पण जाणवत असतो त्यावरच वैद्यकीय अधिकारी निदान करुन उपचार करीत असतात. अमेरिका, चीन, जपान, इटली यासारखे देश स्वतःला विकसनशिल राष्ट्र म्हणून घेतात, अमेरिका चीन तर बलाढ्य राष्ट्रे आहत. अनेक भारतीय इतर देशापेक्षा अमेरिका, चीन मध्ये उच्च शिक्षणासाठी येत असतात. अनेक भारतीय तरुण-तरुणीनी चीन मध्ये वैद्यकीय शिक्षण घेवून भारतात वैद्यकीय सेवा सुरु केलेली आहे. पण त्यानाही कोरोना कोवीड १९ चे गुणधर्म असून आजघडीला मी जगाला वळसा, विळखा घातला असून त्यातून भारतही सुटू शकला नाही. लोकशाही भारताची ही अवस्था आहे तर मुठभर लोकसंख्येच्या देशानी माझ्या नादी लागू नये एवढेच सांगावेशे वाटते.
भारतातील केंद्र सरकार व राज्य सरकारे केवळ इशारा, सूचना देत आहेत. पंरतू भारतातील जनतेला तेथील स्थानीक जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेला माझा सलाम आहे. या त्रिकुटामूळेच मी फैलू शकत नाही. तरी ही गाफील राहू नका लॉकडाउनचे पालन करा, सावध राहा, स्वतःचे स्वतः रक्षक बना मी कोरोना कांही दिवसातच आपली रजा घेतो आहे. सावधान.